fake note racket busted in Pandharpur

fake note racket busted in Pandharpur


पंढरपूर : बनावट चलनी नोटा तयार करण्याचे रॅकेट पंढरपूर शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने उघड केले. या प्रकरणी रणजीत सुखदेव राजगे (रा. कुसमोड, पिलीव, ता. माळशिरस) या बनावट नोटा तयार करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी आरोपीकडून बनावट 11 हजार रूपये, नोटा छापण्याची शाई प्रींटर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. गणेश विसर्जनच्या दिवशी पंढरपूर शहरात संशयास्पद फिरत असताना पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले, अधिक माहिती घेतली असता बनावट नोटा तयार करत असल्याचे त्यांनी कबूल केले.

आरोपीचे शिक्षण केवळ सातवीपर्यंत झाले असून त्याने युट्यूबच्या माध्यमातून त्याने बनावट नोटा तयार करण्याचे धाडस केले. आरोपीकडून दोन हजार, पाचशे, शंभर, पन्नास अशा बनावट नोटाही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे पुढील तपास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे हे करत आहेत.

Web Title: fake note racket busted in Pandharpur
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com